November 16, 2019

नाळ

शाश्वतचा जन्म झाला आणि घरी सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. सगळे आंनदी झाले. सीमा अतिशय दमली होती कळा देऊन. अक्खी रात्र लागली सुटका व्हायला. निरसेसची धावपळ, घरच्यांची लगबग ती अर्धवट ग्लानीत अनुभवत होती.
November 9, 2019

अवकाश

मरीन लाईन्स वरून घरी जाताना सोनाला AC नको वाटायचा. छान खिडकी उघडून वारं गाडीत शिरू द्यायला आवडायचं तिला. त्यात पाऊस असला तर थोडे तुषार पण अंगावर घ्यायला आवडायचं. त्या करड्या आभाळात बघताना चित्रातला अवकाश आपण का शोधत असतो ते तिला कळलं.
November 1, 2019

निर्भयता

निर्भयता म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकारणं. आणि आल्या परिस्थितीला आपल्या परीने तोंड देणं .फार बाऊ न करता. कसं होईल याचा विचार न करत राहणं .. त्याने आपण अर्धे खपतो.
October 20, 2019

पेन आणि कागद

"तू लिहिती हो , तुला जमतंय ते " काकांचं म्हणणं होतं. " हे काय नवीनच?" कांचन विचार करायला लागली. मुद्दाम लिहायचं म्हणून आपण कधी लिहिलं नाही. किंवा आपण काही लेखिका नाही.की नेमक्या शब्दातच आपल्याला लिहिता येईल. आपलं म्हणणं मांडता येईल. एक्सप्रेस करता येईल.
October 4, 2019

रिवाइंड

लहानपणी बाबांचा हात पकडून जाताना जोशी काका म्हणायचे “ काय assistant ? काय म्हणताय ?" असा प्रश्न विचारला की मुग्धाला मस्त वाटायचं . मुळात बाबांचा हात पकडून जाणंच तिला जाम आवडायचं. assistant म्हटलं कि तिला उगाच मोठं झाल्यासारखं वाटायचं.
May 30, 2019

अजून हवं ची गोष्ट

प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं आयुष्य सुकर व्हावं . आपल्याला जेव्हा जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. पण तसं मिळालं नाही तर माणूस सैरभैर होतो. मार्ग जितका कठीण तितकाच आपली स्वःताला आपली ओळख नव्याने होत जाते. आपण बरोबर की चूक हे येणारा काळ ठरवतो. पण आपण त्या क्षणाला सामोरं गेलो याचं समाधान हवं ना?
April 19, 2019

जगण्याची चढाओढ

ज्याच्या जवळ जे असतं तेच तो इतरांना देतो. ज्याच्याजवळ आनंद असतो तो इतरांना आनंद देतो. जो सहृदय असतो तो इतरांना प्रेम देतो. ज्याच्याजवळ मत्सर असतो तो इतरांशी मत्सराने वागतो तर ज्याच्याजवळ तिरस्कार असतो तो इतरांशी तिरस्काराने वागतो.
March 16, 2019

निरपेक्ष … गानयोगी … आनंदी

आप्पांना पाहिलं की या सगळ्या संज्ञा त्यांना तंतोतंत लागू होतात. " क्या खोया क्या पाया" या पलीकडे जाऊन निरपेक्ष वृत्तीने आपलं काम उत्तमपणे करणारे आप्पा. त्यांना भेटून आलं की एक सकारात्मक ऊर्जा मिळत असे. कायम गाण्यातच बुडालेला हा गानयोगी. कितीतरी आठवणी दाटून येतात त्यांच्याबद्दल बोलताना..आठवताना..
February 25, 2019

चिरंजीव अश्वत्थामा

लहानपणी प्रचंड दारिद्र्यामुळे पीठ आणि पाण्याच्या मिश्रणाला दूध म्हणून पिणारा अश्वत्थामा. पित्याच्या महत्वाकांक्षेचा बळी असणारा अश्वत्थामा. महाभारतात कौरवांचे नेतृत्व करून दैदिप्यमान यश मिळवणारा अश्वत्थामा. अत्यंत मेधावी आणि पराक्रमी असा अश्वत्थामा. अमरत्वाचे भाग्य (?) लाभलेला अश्वत्थामा.