January 5, 2019

एकलव्याची व्यथा

व्यासांनी सगळी पात्रं लिहिताना त्याच्या पूर्व जन्मीच्या काही उपकथा जोडल्या आहेत. प्रत्येकाचं वागणं हे त्याच्या पूर्व संचिताची प्रतिक्रिया आहे असं नाट्य उभं केलं. एकलव्याची गुरुभक्ती आणि त्याची त्याने मोजलेली किंमत या गोष्टी ठळकपणे मांडल्या. पण या पात्राचा संदर्भ पुढे कुठेच नाही.
December 31, 2018

महाभारत, व्यासपर्व आणि दुर्गाबाई …

दुर्गा भागवतांचं " व्यासपर्व" पुन्हा एकदा वाचलं. महाभारताचा वेगळा विचार मांडून त्याबद्दल विचार करायला भाग पडणारं लिखाण. प्रत्येक पात्राचं विश्लेषण एका निकषावर आधारित आहे. मुख्य विचारच असा आहे की व्यासांनी काव्य लिहिलं ते द्वापार युगाला अनुसरून. रामायणात जसं चांगला तो चांगला आणि वाईट तो वाईट असं ढोबळ वर्गीकरण केलं गेलं तसं महाभारतात नाही. प्रत्येक पात्रात सत्व-रज आणि तम गुणांचा गुंता आहे. त्यामुळे आजकालच्या भाषेत प्रत्येकाला grey shade आहे.
October 25, 2018

धरमपेठ माता मंदिर रोड

whatsapp मुळे माणसं एका virtual वर्ल्ड मध्ये विसावली म्हणतानाच प्रत्यक्षात असणारी संवादाची भूक पण भागवायला लागलीत. लहानपणी सतत एकत्र असणाऱ्या मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला आणि प्रत्येकीच्या आठवणींचे कप्पे पटापट उघडले. प्रत्येकीला धरमपेठच्या गल्ल्या दिसायला लागल्या . सुपेकरांकडे घातलेला धिंगाणा आठवायला लागला. होळीचं टाकं, गच्चीतले कार्यक्रम, शारदोत्सव, लहानपणीचे नाच , नाटकं, एकत्र बघितलेले रस्त्यावरचे pictures, TV आणि त्यावरचे प्रोग्रॅम्स ...लक्ष्मी नारायण मंदीर.. किती लडी उलगडायला लागल्या. नुसती धमाल.
September 10, 2018

बेशुमार आदमी


जसे आपण घराबाहेर पडतो तसे अनेक चेहरे दिसायला लागतात. ओळखीचे कमी अनोळखीच जास्त. ना नात्याचे आणि गोत्याचे. मला ना अशी वलयं दिसायला लागतात एकेका भोवती.
April 21, 2018

का ठेवावा आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास?

आपण इतके जाड कातडीचे झालो आहोत का? सारखा प्रश्न मनात येतो कि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात ... जिथे न्याय व्यवस्था सगळ्यात श्रेष्ठ मानायला हवी.. त्यावरच कुणाचा विश्वास नाही... का ठेवावा आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास?
January 10, 2018

काय करावे बरं ?

live life as it comes to you असं म्हणतात पण ध्येय गाठण्याचा संघर्ष ही असावा म्हणतात ..कसे करावे बरं ? ध्येय नसेल तर रोजच्या सूर्याला काय सांगणार किंवा येणाऱ्या दिवसाला तोंड दिल्याशिवाय उद्या कसा उगवणार?
December 5, 2017

मनाशी संवाद

आपण आपल्या मनाशी कितीदा बोलतो? इतरांशी अनेक विषयांवर अखंड बोलत असणारे आपण स्वतःशी सुसंवाद करतो का? इतरांशी वाद घालणारे आपण मनाशी भांडतो का?
November 12, 2017

एका प्रवासाची कथा

मागे एकदा कार्यक्रम आटोपून दादरहून घरी येत होते. रात्रीची वेळ होती. प्रचंड दमले होते. टॅक्सिवल्याने जुनी गाणी लावली होती.. कदाचित रेडिओच होता. मोहम्मद रफी, लताबाई, आशाबाई ऐकलं की तसंही छानच वाटतं.
September 28, 2017

कुमुद …कुमुदिनी ..आई

माझी आई .. आम्हा पाच बहिणींच्या शिक्षणाबद्दल जागरूक. आम्ही आमच्या पायावर उभं राहायला पाहिजे यासाठी धडपडणारी .. कधी अभ्यास घेतल्याचं आठवत नाही पण घरात अभ्यासाचं वातावरण होतं .वाढत्या वसायानुसार पडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देत होती. कधी वादावादी झालीच तर शेवटी " चल काहीतरीच बोलते ' असं म्हणायची. कधी गंमतही यायची तिला चिडवायला.