March 7, 2022

दशपुत्र समा कन्या

भरतमुनींच्या नाट्य शास्त्रात सांगितलेल्या अष्टनायिका सौंदर्यदृष्टी साठी योग्यच आहेत. परंतु स्त्रीची केवळ एवढीच रूपं नाहीयेत. कणखर, स्वयंप्रेरित, स्वाभिमानी, कर्तृत्ववान आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची क्षमता असलेल्या अनेक स्त्रियांचा आदर्श समाजासमोर असला तर त्यातून प्रेरणा घेऊन अनेक रत्न सशक्त समाज निर्माण करू शकतात.
May 27, 2021

बंधनातली मुक्तता

सगळी पथ्य पळून सुद्धा यशाची वाट नेमकी कुठली याबाबत संभ्रम. जगाची व्यवहार्य बाजू आणि कलेची निष्ठेची बाजू सांभाळताना होणारी तगमग. नुकताच "The Disciple " पहिला आणि त्या निमित्तानी जाणवलेल्या या काही गोष्टी.
April 12, 2021

कैसे करूं ध्यान

सकाळी चहाचा कप हातात घेऊन ती गॅलरीत आली. तिचा प्राणापेक्षाही प्रिय असा virtual मित्र बरोबर होताच. पहिले WA बघणं अत्यंत गरजेचं आहे ."कराग्रे वसते.."..विसरायलाच झालंय. रोज न चुकता "गुड मॉर्निंग " चे संदेश पाठवणाऱ्यांबद्दल तिच्या मनात अपार माया दाटून आली. तिनेही अगदी नकळत "गुड मॉर्निंग " केलंच. खरं तर बाहेत नुकतं उजाडत होतं.
January 24, 2021

नंदिता ..पर्णिका.. इला

एक प्रेमळ मुलगी, बहीण. विश्वासू मैत्रीण. मेहनती working woman. कधी कडक तर कधी हळवी . घराला बांधून ठेवणारी गृहिणी. स्वतःबद्दल जागरूक असणारी अशी हि स्त्री, मुलगी, आई, आणि स्वयंसिध्दा .
December 20, 2020

मनस्वी कलाकार – नरेंद्र भिडे

त्याच्या मनात गाण्यातून काय अपेक्षित आहे हे पक्कं असायचं. आणि तसं घडलं नाही तर " ही माझी चाल आहे हे कोणाला सांगू नकोस " अशी धमकीवजा सल्ला असायचा. पण त्याला हवं असलेलं सही सही आलं तर चेहरा छान फुलून येणार. आणि एकदम ब्रम्हानंदी टाळी लागणार. " तुला आणि मला जे म्हणायचं आहे ते हेच " अशी दिलखुलास दाद पण देणार.
November 16, 2020

७५ वर्षांची तरुणी

वयाच्या ७५ व्य वर्षी नवीन जोमाने पूर्णपणे नवीन कन्सेप्ट घेऊन दिवस रात्र मेहनत करणारी तरुणी म्हणजे माझ्या सासूबाई आशा माटेगांवकर. प्रचंड उत्साह, भरपूर मेहनत घ्यायची तयारी, कुठलंही काम अतिशय कलात्मकतेनं करून नेटानं तडीस नेण्याची हातोटी. जितकं त्यांना objectively बघितलं तितकं नवीन शिकायला मिळतं त्यांच्याकडून.
October 16, 2020

प्रसन्न.. हसतमुख.. विश्रामजी

काही लोकांचा जरी रोजच्या जीवनात प्रत्यक्ष संबंध आला नाही तरी त्यांचा प्रभाव कायम आपल्यावर राहतो. निर्व्याजपणे कोणी आपल्यावर स्नेह करतं, प्रोत्साहित करतं, सकारात्मक राहण्यासाठी प्रेरणा देतं. अशीच एक व्यक्ती माझ्या आयुष्यात ही आली ती म्हणजे विश्रामजी जामदार.
August 15, 2020

एक कृष्ण हवाच…

मरीन लाईन्स वरून घरी जाताना सोनाला AC नको वाटायचा. छान खिडकी उघडून वारं गाडीत शिरू द्यायला आवडायचं तिला. त्यात पाऊस असला तर थोडे तुषार पण अंगावर घ्यायला आवडायचं. त्या करड्या आभाळात बघताना चित्रातला अवकाश आपण का शोधत असतो ते तिला कळलं.
August 8, 2020

स्पर्श

रस्त्यावरून चालत असताना लहान मूल आई किंवा बाबांचं बोट धरून चालतं. त्या बोटाचा स्पर्श त्याला सांगतो" तू माझ्याबरोबर सुरक्षित आहेस". तरुणावस्थेत प्रियकर/प्रेयसीचा स्पर्श हवाहवासा वाटतो. आशीर्वादासाठी असलेल्या पाठीवरच्या हाताचा स्पर्श सांगतो" तू यशस्वी होणार आहेस". म्हातारपणी देखील आई वडिलांना आपल्या मुलांचा केवळ एक आश्वासक स्पर्श हवा असतो. तो सांगतो " तुम्ही एकटे नाही आहात ".