November 9, 2016

पडा धडपडा आणि पुढे जा

लहानपणापासून मला अभ्यास करायला आवडायचं. पहिल्या ३नात नंबर असायचा. ७ वीत असताना काय भूत शिरलं माहित नाही, अभ्यासाचा कंटाळा यायचा. त्याचा परिणाम म्हणून माझा ४था नंबर आला. खूप वाईट वाटलं. आपलं यश कधी गृहीत धरू नये.
October 16, 2016

सगुण साकार /निर्गुण निराकार

दहावीत असताना एक निबंध लिहायला सांगितलं होतं ." देव-सत्य कि भास?" दहावीच्या मानाने विषय जडच होता.पण मी लिहिल्याचं आठवतंय . नक्की काय लिहिलं ते आठवत नाहीये पण तेव्हाही विश्वास आणि श्रद्धा या बाबतीती थोडे विचार पक्के झाले होते कदाचित.
June 19, 2016

बापाच्या लेकी

काल चतुरंग मध्ये डॉ. कमलाबाई भागवत-सोहोनीन्बद्दल वाचलं. प्रचंड अभिमान वाटला. अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरणादायी जीवन. कमलाबाई या Lady Scientist होत्या. "जीव-रसायनशास्त्र" हा त्यांचा अभ्यासाचा विषय.
March 5, 2016

झाशीच्या राण्यांचा दिवस

स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष उलटून गेलीत . पण अजूनही महिलांना आपल्या हक्कांसाठी झगडावं लागतंय. जे हक्क समाजाने पुरुषाला सहज दिलेत ते स्त्रीला देण्यासाठी अजून मानसिकता तयार होत नाही हे मोठं दुर्दैव आहे आपलं. पण या विषयाला अनेक कंगोरे आहेत.
October 4, 2015

मनाचे व्यापार

मनाची शांतता राखणं महत्वाचं. मन शांत, composed असलं की बाहेरच्या गोंगाटाचा त्यावर परिणाम होत नाही . पण मन ही एक फार मोठी आणि गहन गुहा आहे. एखाद्याचे मनोव्यापार ब्रह्मदेवालाही कळणार नाहीत. त्यामुळे "मी त्याला ओळखतो" असा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते काही खरं नसतं.
June 20, 2015

पार न पायो

सात सुरांची जादू. अथांग, विशाल, न संपणारं आकाश. ज्याचा जसा उगम माहिती नाही तसा अंतही नाही. तरीही प्रत्येकानं आपलं गाणं गावं. स्वतःमध्ये रमावं. स्वतःला शोधावं.स्वतःला विसरावं. अज्ञात अशा त्या अनंताकडे झेप घ्यावी.
June 11, 2015

ऋण फिटता फिटेना

अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर आलेलं चेहऱ्यावरचा तेज. कुठल्याच परतफेडीची अपेक्षा न करता केलेला व्यासंग आणि त्यामुळे आतून असलेली मनाची प्रसन्नता . संगीताविषयी तळमळ आणि नित्य काहीतरी "घडविण्याची" आस. आप्पांना पाहिलं कि हे सगळं जाणवतं. आप्पा म्हणजे माझे गुरु श्री . आप्पासाहेब इंदूरकर.
May 11, 2015

जागतिक मातृदिन

किती छान कल्पना! मातृत्व साजरं करायचं. या निमित्ताने मुलांनी आयांना छोट्या-छोट्या भेटी द्यायच्या. तेवढ्या लहानशा gesture नी आई खुश होऊन जाते. ते लहानसं card असतं. surprise द्यायचा असतं. ते आईला कळू नये म्हणून धडपडणं. जो आनंद आई कायम " देण्यात" मिळवते , तसाच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो.
April 3, 2015

समाज ऋण

" आनंदवनात " जाऊन आलेय. आता हेमलकाशालाही जायचं पक्कं झालंय. आपला खारीचा वाटा आपणही उचलायला हवा. समाजाचं ऋण फेडावं अशा वातावरणात वाढलेलो आम्ही . आई बाबांची शिकवण रुजायला हवी. प्रकाश वाटा वाचताना हे भान पुन्हा आलं… समाज ऋण.