November 9, 2019

अवकाश

मरीन लाईन्स वरून घरी जाताना सोनाला AC नको वाटायचा. छान खिडकी उघडून वारं गाडीत शिरू द्यायला आवडायचं तिला. त्यात पाऊस असला तर थोडे तुषार पण अंगावर घ्यायला आवडायचं. त्या करड्या आभाळात बघताना चित्रातला अवकाश आपण का शोधत असतो ते तिला कळलं.
November 1, 2019

निर्भयता

निर्भयता म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकारणं. आणि आल्या परिस्थितीला आपल्या परीने तोंड देणं .फार बाऊ न करता. कसं होईल याचा विचार न करत राहणं .. त्याने आपण अर्धे खपतो.
October 20, 2019

पेन आणि कागद

"तू लिहिती हो , तुला जमतंय ते " काकांचं म्हणणं होतं. " हे काय नवीनच?" कांचन विचार करायला लागली. मुद्दाम लिहायचं म्हणून आपण कधी लिहिलं नाही. किंवा आपण काही लेखिका नाही.की नेमक्या शब्दातच आपल्याला लिहिता येईल. आपलं म्हणणं मांडता येईल. एक्सप्रेस करता येईल.
October 4, 2019

रिवाइंड

लहानपणी बाबांचा हात पकडून जाताना जोशी काका म्हणायचे “ काय assistant ? काय म्हणताय ?" असा प्रश्न विचारला की मुग्धाला मस्त वाटायचं . मुळात बाबांचा हात पकडून जाणंच तिला जाम आवडायचं. assistant म्हटलं कि तिला उगाच मोठं झाल्यासारखं वाटायचं.
February 25, 2019

चिरंजीव अश्वत्थामा

लहानपणी प्रचंड दारिद्र्यामुळे पीठ आणि पाण्याच्या मिश्रणाला दूध म्हणून पिणारा अश्वत्थामा. पित्याच्या महत्वाकांक्षेचा बळी असणारा अश्वत्थामा. महाभारतात कौरवांचे नेतृत्व करून दैदिप्यमान यश मिळवणारा अश्वत्थामा. अत्यंत मेधावी आणि पराक्रमी असा अश्वत्थामा. अमरत्वाचे भाग्य (?) लाभलेला अश्वत्थामा.
January 5, 2019

एकलव्याची व्यथा

व्यासांनी सगळी पात्रं लिहिताना त्याच्या पूर्व जन्मीच्या काही उपकथा जोडल्या आहेत. प्रत्येकाचं वागणं हे त्याच्या पूर्व संचिताची प्रतिक्रिया आहे असं नाट्य उभं केलं. एकलव्याची गुरुभक्ती आणि त्याची त्याने मोजलेली किंमत या गोष्टी ठळकपणे मांडल्या. पण या पात्राचा संदर्भ पुढे कुठेच नाही.
December 31, 2018

महाभारत, व्यासपर्व आणि दुर्गाबाई …

दुर्गा भागवतांचं " व्यासपर्व" पुन्हा एकदा वाचलं. महाभारताचा वेगळा विचार मांडून त्याबद्दल विचार करायला भाग पडणारं लिखाण. प्रत्येक पात्राचं विश्लेषण एका निकषावर आधारित आहे. मुख्य विचारच असा आहे की व्यासांनी काव्य लिहिलं ते द्वापार युगाला अनुसरून. रामायणात जसं चांगला तो चांगला आणि वाईट तो वाईट असं ढोबळ वर्गीकरण केलं गेलं तसं महाभारतात नाही. प्रत्येक पात्रात सत्व-रज आणि तम गुणांचा गुंता आहे. त्यामुळे आजकालच्या भाषेत प्रत्येकाला grey shade आहे.
September 28, 2017

कुमुद …कुमुदिनी ..आई

माझी आई .. आम्हा पाच बहिणींच्या शिक्षणाबद्दल जागरूक. आम्ही आमच्या पायावर उभं राहायला पाहिजे यासाठी धडपडणारी .. कधी अभ्यास घेतल्याचं आठवत नाही पण घरात अभ्यासाचं वातावरण होतं .वाढत्या वसायानुसार पडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देत होती. कधी वादावादी झालीच तर शेवटी " चल काहीतरीच बोलते ' असं म्हणायची. कधी गंमतही यायची तिला चिडवायला.