" मनीला ९० टक्के मिळाले. ९५ मिळाले असते तर जास्त बरं झालं असतं." , " चांगल्या सोसायटी मध्ये २ bhk चा घर घेतलं . थोडे अजून पैसे असते तर ३ bhk घेता आलं असतं ." , " २ dresses घेतले. पण हवा तो हिरवा रंग काही मिळाला नाही.", " माहेश्वरी चांगलीये ग, पण पैठणी हवी होती." इथपासून तर " सून चांगली आहे गं पण थोडी अजून गोरी हवी होती." ," जावई छान आहे गं पण पगार थोडा आणखी हवा होता." अगदी आपण लहानपणापासून पाहिलं तर बाळाचं वजन २ kg असेल तर ३ kg तरी हवं असं आई म्हणते . बाळ लवकर बोलायला हवं. ४ शब्द बोलत असेल तर ५ का नाही? शाळेत जायला लागल्यापासून तर आणखी मार्क्स.. पहिला नंबर यायला हवा.. कारण..अजून हवं
याबरोबर स्वतःचे संघर्ष पण चालू असतात. नोकरीमध्ये पगार हा कधीच समाधानाचा नसतो. प्रत्येकाला वाटतं आपल्या कष्टाचं इथे चीज होत नाही..अजून हवं . सासू सुनेच्या वादात पण हे अजून हवं चाच रोल असतो.
नेमकं काय हवं असतं आपल्याला?आपण आपल्याच अपेक्षा आपल्याकडून किती वाढवून ठेवतो? जगण्याची ऊर्जा " अजून हवं " यातून मिळते हे जरी मान्य केलं तरीही " चित्ती असो द्यावे समाधान " असं संतांनी का सांगितलं असेल याचा आपण विचार करतो का?
जगण्यातला चिवटपणा हा या "अजून हवं " मुळे टिकून राहतो. " मला आता काही नको" असा म्हणणारा विरळाच. ते जिवंतपणाचं लक्षण मानू या का? पण यातून आणखी उत्साहाने काम करण्याची ऊर्जा मिळत असेल तर ते योग्य पण त्यामुळे मोह-मत्सर हे दुर्गुण येणार असतील तर आयुष्यात नकारात्मकता जास्त येते . आणि मग वर्तमानातील आनंद उपभोगू नाही शकत आपण.
प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं आयुष्य सुकर व्हावं . आपल्याला जेव्हा जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. पण तसं मिळालं नाही तर माणूस सैरभैर होतो. मार्ग जितका कठीण तितकाच आपली स्वःताला आपली ओळख नव्याने होत जाते. आपण बरोबर की चूक हे येणारा काळ ठरवतो. पण आपण त्या क्षणाला सामोरं गेलो याचं समाधान हवं ना?
या अजून हवं च्या शर्यतीत आपण काही गमावून बसतोय का? आपली सकारात्मकता पणाला लावतोय का? हे कधीतरी ठरवायला हवं . इतरांकडून अपेक्षा किंवा नाहक अपेक्षांचं ओझं आपण स्वतःवर लादून घेतोय का? ही " अजून हवं" ची गोष्ट संपतच नाही. imperfection is beautiful sometimes.अशी खिलाडू वृत्ती घेऊन हे अजून हवं च जोखड उतरवता येईल का?
नेमकं काय हवं असतं आपल्याला?आपण आपल्याच अपेक्षा आपल्याकडून किती वाढवून ठेवतो? जगण्याची ऊर्जा " अजून हवं " यातून मिळते हे जरी मान्य केलं तरीही " चित्ती असो द्यावे समाधान " असं संतांनी का सांगितलं असेल याचा आपण विचार करतो का?
2 Comments
अणूपासून… लेख अगदी नवीन विचार मांडतो.
आत्ता समाधान च तर नाहीये कारण समाधान या शब्दाचा अर्थ आणि त्या मागचा भाव कळणे कधीच संपवलय आपणच.