June 20, 2015

पार न पायो

सात सुरांची जादू. अथांग, विशाल, न संपणारं आकाश. ज्याचा जसा उगम माहिती नाही तसा अंतही नाही. तरीही प्रत्येकानं आपलं गाणं गावं. स्वतःमध्ये रमावं. स्वतःला शोधावं.स्वतःला विसरावं. अज्ञात अशा त्या अनंताकडे झेप घ्यावी.
June 11, 2015

ऋण फिटता फिटेना

अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर आलेलं चेहऱ्यावरचा तेज. कुठल्याच परतफेडीची अपेक्षा न करता केलेला व्यासंग आणि त्यामुळे आतून असलेली मनाची प्रसन्नता . संगीताविषयी तळमळ आणि नित्य काहीतरी "घडविण्याची" आस. आप्पांना पाहिलं कि हे सगळं जाणवतं. आप्पा म्हणजे माझे गुरु श्री . आप्पासाहेब इंदूरकर.
May 11, 2015

जागतिक मातृदिन

किती छान कल्पना! मातृत्व साजरं करायचं. या निमित्ताने मुलांनी आयांना छोट्या-छोट्या भेटी द्यायच्या. तेवढ्या लहानशा gesture नी आई खुश होऊन जाते. ते लहानसं card असतं. surprise द्यायचा असतं. ते आईला कळू नये म्हणून धडपडणं. जो आनंद आई कायम " देण्यात" मिळवते , तसाच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो.
April 3, 2015

समाज ऋण

" आनंदवनात " जाऊन आलेय. आता हेमलकाशालाही जायचं पक्कं झालंय. आपला खारीचा वाटा आपणही उचलायला हवा. समाजाचं ऋण फेडावं अशा वातावरणात वाढलेलो आम्ही . आई बाबांची शिकवण रुजायला हवी. प्रकाश वाटा वाचताना हे भान पुन्हा आलं… समाज ऋण.
January 27, 2015

आनंदाची वाट

आपण नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टींची वाट पाहत असतो. लहान बाळाला घरी येणाऱ्या आईची वाट, पत्नीला पतीची वाट, आई वडिलांना माहेरी येणाऱ्या मुलीची वाट, दुःखाला सुखाची वाट, application केली असताना interview call ची वाट ….वगैरे।वगैरे …
June 18, 2014

अमेरिका वारी

अमेरिकेला जायचं असं ठरल्यापासूनच एक उत्सुकता, anxity होती. तशी काही पहिलीच visit नाही पण माझ्यासाठी म्हणून झालेली पहिलीच. म्हणून जास्त मजा. दोन वेगवेगळे देश. वेगवेगळ्या श्रद्धा, वेगवेगळ्या प्रवृत्ती, वेगवेगळ्या जगण्याच्या पद्धती. सगळ्यात भावली ती माणसानी माणसाला दिलेली personal space.
March 2, 2014

माझी आई

आई कायम मनातच राहिली आहे. एक वेगळा कोपरा तिच्यासाठी reserved आहे. आयुष्याचे दोन भाग आहेत. आई असतानाचं पण न कळतं आयुष्य आणि एक नसतानाचं कळत्या वयातलं आयुष्य. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी आई नसल्याचं दुःख, कमतरता कायम जाणवत राहिली आहे.
March 2, 2014

मैत्र

अमेरिकेला जायचं असं ठरल्यापासूनच एक उत्सुकता, anxity होती. तशी काही पहिलीच visit नाही पण माझ्यासाठी म्हणून झालेली पहिलीच. म्हणून जास्त मजा. दोन वेगवेगळे देश. वेगवेगळ्या श्रद्धा, वेगवेगळ्या प्रवृत्ती, वेगवेगळ्या जगण्याच्या पद्धती. सगळ्यात भावली ती माणसानी माणसाला दिलेली personal space.
February 25, 2014

आमच्या साने बाई

अजून एक क्लेशदायक बातमी मिळाली. साने बाईना देवाध्न्या झाली. मला त्यांनी ३ वर्ष शिकवलं. अगदी प्राथमिक शाळेत १ली ते ३री. फारच लहान होतो आम्ही.