July 9, 2020

पावती

सातत्याने केलेल्या कलेच्या जपणुकीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं निमिषला. गुरुपौर्णिमेला मिळालेली ही पावती. मनातून गुरूंना त्याने नमस्कार केला आणि हे गुरूने स्वतः सांगणं यात त्यांच्या मनाचा किती मोठेपणा आहे हे त्याला जाणवलं. जे शब्द ऐकण्यासाठी शिष्य आपले आयुष्य पणाला लावतो तो क्षण त्याच्या आयुष्यात आला. तो भरून पावला.
July 9, 2020

कसे करावे बरे

तिचं गाणं करावं म्हणून ती लोकांना भेटायला जायची स्वतःची CD आणि profile घेऊन. रियाज अखंड चालूच होता. तिला वाटायचं की organisers ते वाचतील, CD ऐकतील आणि आवडलं / नाही आवडलं तर कळवतील. पण असं काही घडत नव्हतं. काही दिवसांनी/ महिन्यांनी ती त्यांना phone करायची किंवा भेटायला जायची तेव्हा तिला मिळालेली उत्तरं फारच मजेशीर असायची.
May 13, 2020

प्रिया शामवर्णी पंडिता द्रौपदी

युद्धाने सगळं मानवी जीवन उध्वस्त होईल, काहीही उरणार नाही. हे पदोपदी सांगूनही द्रौपदीने युधिष्ठिराला बोल लावले आणि भीम आणि अर्जुनाचा राग सतत जागृत ठेवला. द्रुपदाची कन्या, पांडवांची पत्नी, धृष्टद्युम्नाची बहीण असून देखील कायम कष्टप्रद जीवन घालवणारी अशी ही द्रौपदी.
April 19, 2020

निर्मोही पितामह भीष्म

भीष्माचं आयुष्य काही साधं सोपं सरळ नव्हतं. पदोपदी नवीन आव्हानं पेलत त्याने वाटचाल केली. तो तसा निःसंग होता. प्रपंचात राहूनही अलिप्त होता. कर्तव्याला कुठे चुकला नाही. कष्ट फार केलेत पण. दिवसेंदिवस तो आणखीनच विचारशील आणि आत्ममग्न होत गेला.
April 6, 2020

विज्ञानातून मानवतेकडे

नुकतंच इव्ह क्युरी हिने मादाम क्युरी आणि पिएर क्युरी यांच्यावर लिहिलेलं पुस्तक वाचलं. मी डॉ अश्विनी भिडे-देशपांडे यांनी लिहिलेला मराठी अनुवाद वाचला. झपाटल्यासारखं वाचून काढलं आणि थक्क झाले. केवळ विज्ञान आणि विज्ञानाचाच विचार करणारं हे जोडपं. परस्परपूरक काम करणारी ही दोघं. स्वतःच्या आयुष्याचं ध्येय खूप आधी माहिती असणारं हे जोडपं.
March 27, 2020

अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा !

सोळाव्या शतकात रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र लिहिलं. त्यात " अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे" ..असं लिहिलंय.. रसायनशास्त्र शिकताना.. अणू -रेणू..proton -neutron -electron याबद्दल ही शिकलो.
March 8, 2020

शास्त्रीय संगीतातील स्त्रिया

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत अनेक अंगांनी सजवलं गेलं. ख्यालगायन, ठुमरी, दादरा , नाट्यगीते यातून ते फुलून आलं. शिक्षणासाठी जसा स्त्रियांना संघर्ष करावा लागला त्याचप्रमाणे गाणं करण्यासाठी पण प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागला.
February 10, 2020

घरोघरी हिरकणी

हिरकणी केवळ शिवकालीनच नव्हती. झाशीच्या राणीने एकदाच जन्म नाही घेतला. मातृत्वाची जवाबदारी आणि ओढ प्रत्येक काळात सारखीच . गड उतरून येणं काय, घोडा घेऊन शत्रूवर तुटून पडणं काय, स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या रीमा आणि अनघा काय.. सगळी ही हिरकणी आणि झाशीच्या राणीचीच रूपं ..
December 31, 2019

स्वर

प्रत्येक स्वराला " श्रुती " असते. श्राव्य (सु) असा स्वर त्या त्या श्रुतीवर गेला तर त्याचा सूर होतो. म्हणून प्रत्येक रागातील स्वर हा वेगळ्या श्रुतीवर असतो. म्हणून रिषभ मारव्यातला वेगळा आणि तोडीतला वेगळा. एक कारुण्य घेऊन येणार तर एक भक्ती घेऊन येणारा.