सातत्याने केलेल्या कलेच्या जपणुकीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं निमिषला. गुरुपौर्णिमेला मिळालेली ही पावती. मनातून गुरूंना त्याने नमस्कार केला आणि हे गुरूने स्वतः सांगणं यात त्यांच्या मनाचा किती मोठेपणा आहे हे त्याला जाणवलं. जे शब्द ऐकण्यासाठी शिष्य आपले आयुष्य पणाला लावतो तो क्षण त्याच्या आयुष्यात आला. तो भरून पावला.