Dr. Meenal Mategaonkar

September 20, 2017

पावसातली एक संध्याकाळ

पावसाबद्दल लोकांच्या फारच रोमँटिक कल्पना असतात. काव्य स्फुरत म्हणे पाऊस बघून. पण जेव्हा " मौसम मस्ताना..आज्जीबातच गरज नसताना " अशी अवस्था असते तेव्हा सगळे आपली प्रतिभा बासनात बांधून आज नेमका रिक्षा -बसने घरी जायचा कि बोटीने याचा विचार करतात.
March 31, 2017

Generation Gap

नवीन पिढी खूप fast आहे हे मान्य करावंच लागेल. नवीन गोष्टी ते भराभर शिकतात. त्या apply करतात. वेळ साजरी करतात . गेल्या २-३ वर्षांपासून मी माझ्या college च्या students activities मध्ये लक्ष घालतेय. त्यात एखाद्या टीम साठी त्यांचा selection करणं, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालवणं , गेस्ट lectures arrange करणं, त्यासाठीची तयारी करवून घेणं हे आलं . यात मी बऱ्याच गोष्टी शिकले. बरीच निरीक्षणं केलीत.
February 5, 2017

व्यासंग

उत्तम संगीताची आवड असणारं आमचं घर आहे. माझ्या सासऱ्यांना उत्तम, कसदार, श्रवणीय संगीत मग ते गाणी असो,वाद्य असो.. असा ऐकण्याचा आणि collection ठेवण्याचा नाद होता.
November 9, 2016

पडा धडपडा आणि पुढे जा

लहानपणापासून मला अभ्यास करायला आवडायचं. पहिल्या ३नात नंबर असायचा. ७ वीत असताना काय भूत शिरलं माहित नाही, अभ्यासाचा कंटाळा यायचा. त्याचा परिणाम म्हणून माझा ४था नंबर आला. खूप वाईट वाटलं. आपलं यश कधी गृहीत धरू नये.
October 16, 2016

सगुण साकार /निर्गुण निराकार

दहावीत असताना एक निबंध लिहायला सांगितलं होतं ." देव-सत्य कि भास?" दहावीच्या मानाने विषय जडच होता.पण मी लिहिल्याचं आठवतंय . नक्की काय लिहिलं ते आठवत नाहीये पण तेव्हाही विश्वास आणि श्रद्धा या बाबतीती थोडे विचार पक्के झाले होते कदाचित.
June 19, 2016

बापाच्या लेकी

काल चतुरंग मध्ये डॉ. कमलाबाई भागवत-सोहोनीन्बद्दल वाचलं. प्रचंड अभिमान वाटला. अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरणादायी जीवन. कमलाबाई या Lady Scientist होत्या. "जीव-रसायनशास्त्र" हा त्यांचा अभ्यासाचा विषय.
March 5, 2016

झाशीच्या राण्यांचा दिवस

स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष उलटून गेलीत . पण अजूनही महिलांना आपल्या हक्कांसाठी झगडावं लागतंय. जे हक्क समाजाने पुरुषाला सहज दिलेत ते स्त्रीला देण्यासाठी अजून मानसिकता तयार होत नाही हे मोठं दुर्दैव आहे आपलं. पण या विषयाला अनेक कंगोरे आहेत.
January 5, 2016

उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे

स्वतःच्या जगण्याबरोबर इतरांचाही विकास, आदर आणि सन्मान व्हावा हे साधं परंतु कठीण तत्व अंगीकारून २१विशी पार केलेल्या उत्तुंग संस्थेला भरघोस प्रतिसाद मिळो. आशाताई आणि माधवरावांना असाच टवटवीत ठेवो आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सतत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
October 4, 2015

मनाचे व्यापार

मनाची शांतता राखणं महत्वाचं. मन शांत, composed असलं की बाहेरच्या गोंगाटाचा त्यावर परिणाम होत नाही . पण मन ही एक फार मोठी आणि गहन गुहा आहे. एखाद्याचे मनोव्यापार ब्रह्मदेवालाही कळणार नाहीत. त्यामुळे "मी त्याला ओळखतो" असा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते काही खरं नसतं.