"माझ्या एवढं कोणी तुला रागावलं आहे का?" , " नाही कुणीच नाही . माझ्या आई बाबांनी , शिक्षकांनी कोणीच नाही ." हा संवाद होता blending notes या albumchya पहिल्या गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळी. मी classical खाली मांडी घालून गात असे. उभं राहून गायचं असेल तर श्वास कसा घ्यायचा इथपासून माझं शिकणं होतं. त्यामुळे त्याला हवा तसा साऊंड , भाव आणि एक्स्प्रेशन येत नव्हतं. मीही अगदी त्या प्रांतात पाहिलीत असल्यामुळे सगळं ऐकून घेत होती.
त्याच्या मनात गाण्यातून काय अपेक्षित आहे हे पक्कं असायचं. आणि तसं घडलं नाही तर " ही माझी चाल आहे हे कोणाला सांगू नकोस " अशी धमकीवजा सल्ला असायचा. पण त्याला हवं असलेलं सही सही आलं तर चेहरा छान फुलून येणार. आणि एकदम ब्रम्हानंदी टाळी लागणार. " तुला आणि मला जे म्हणायचं आहे ते हेच " अशी दिलखुलास दाद पण देणार.
blending notes माझ्यासाठी तर खूपच छान प्रवास होता. प्रत्येक गाणं वेगळं आणि त्यात एक" नरेंद्र " touch. त्यात वाद्यांचे selection , rhythm section सगळं छान जुळून आलेलं. यात सगळी वाद्य ओरिजिनलच वापरायची याबाबत काटेकोर. त्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान चा प्रत्येक क्षण आठवतो. ८ वर्ष झालीत त्याला. पण त्यातला आनंद अजूनही ताजा आहे.
तेव्हाच सुरु झालेली "संत म्हणे " ची नांदी. ४ वर्षांनी त्याचा मुहूर्त लागला. सगळे अभंग त्यानेच निवडले. "आपण हे अभंगच करू" असा आग्रह. त्यासाठी बरेच संदर्भ शोधणं, चाली बसवणं , music arrangement करणं, संत जनाबाईंच्या अभंगाने सुरुवात करू या. त्यात पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यापेक्षा आधुनिक वाद्य वापरू या. गाण्याच्या आधी भरपूर rehearsals, भरपूर चहा, भरपूर हसणं, नाराज होणं. अचानक " आज नको करू या" पुढच्या वेळी करू " म्हणजे माझं मुंबईचं schedule सांभाळुन जायला किती वेळ लागेल माहित नाही. पण असं हे मनस्वीपण. कारण कामावर श्रद्धा , प्रेम . आपण काय करतोय याचं नक्की असलेलं भान. आणि त्याच्याशी तडजोड नाही. त्याची जिगर राजासारखी होती. अनेक प्रोजेक्ट्स डोक्यात होते. भरपूर काम करायचं होतं.
पण आपण ठरवतो एक आणि होतं भलतंच. असंच काहीसं झालं आणि त्याची ऊर्जा संपली. एक प्रचंड हुरहूर लावून ते हास्य नाहीसं झालं आणि एक कलंदर माणूस या जगाच्या पडद्याआड झाला. क्षणभंगुर जगण्यातलं सत्य पुन्हा अधोरेखित करून तो गेला. मी आणि अमोलने एक चांगला मित्र गमावला
नरेंद्र भिडे-- या मातीतील सूर गाताना तुमची आठवण नक्की येणार.
2 Comments
Beautifully expressed. !
Miss you babdu kaka.
मीनल.. तू लिहिलेला तुझ्या आईवरचा लेख, मन फारच हळवा करून गेला. तुझ्या आईला “जगणं म्हणजे काय?” हे नेमकेपणाने समजलं होतं.. असं वाटतं! किती चालायचं व कुठे थांबायचं? याबद्दल तिच्या मनात स्पष्टता होती.. आणि हो आईच्या वाटचालीत तुझ्या बाबांची भरभक्कम साथ.. याचं श्रेय त्यांना द्यायला हवं.!आईने तिला हवा असलेला “कोनाडा” हळूच शोधून काढला होता.. स्वहस्ताक्षरात दासबोध लिहून काढला.. व त्या दोघांचे ” या हृदयीचे त्या हृदयी” इतकं होतं की बाबांनी दासबोधाचं हिंदीत भाषांतर केले.. मला तुझे सगळे लेख आवडतात.
तुझी शैली एकदम साधी, सरळ व सोपी आहे व म्हणूनच मनाला भिडणारी आहे.. अशीच दिलखुलास लिहित रहा..