वयाच्या ७५ व्य वर्षी नवीन जोमाने पूर्णपणे नवीन कन्सेप्ट घेऊन दिवस रात्र मेहनत करणारी तरुणी म्हणजे माझ्या सासूबाई आशा माटेगांवकर. प्रचंड उत्साह, भरपूर मेहनत घ्यायची तयारी, कुठलंही काम अतिशय कलात्मकतेनं करून नेटानं तडीस नेण्याची हातोटी. जितकं त्यांना objectively बघितलं तितकं नवीन शिकायला मिळतं त्यांच्याकडून.
आणि हा उत्साह गेल्या २०-२१ वर्षांपासून मी अनुभवतेय. माझं लग्न झालं तेव्हाच त्या ५४-५५ वर्षांच्या असतील. आमच्या सगळ्यांपेक्षा दुप्पट काम करायच्या तेव्हाही. ते घरचं काम असो, एखादा सण असो, कुळाचार असो, बाहेरची कामं असो. तेवढ्याच efficiency आणि grace नी करायच्या त्या. मी बघितलेल्या त्यांच्या त्या वयातल्या बायकांपेक्षा त्यांचं काम जास्त नीट नेटकेपणाचं आणि स्वतःचा एक touch असलेलं असायचं.
मला म्हणायच्या मी खूप देवधर्म वगैरे करणारी नाही पण आमच्या घरात पूर्वीपासून आलेले सणवार छान करायच्या. त्यांची पूजेची तयारी फारच सुंदर असते. एखाद्या पदार्थाची "त्यांची" अशी एक पद्धत आहे. आम्ही सुनांनी बराच adapt करायचा प्रयत्न केला तरी त्यांचा पदार्थ तो त्यांचाच.
स्वेटर्स करणे, बाळंतविडे करणे, अनेक गृहोपयोगी वस्तू बनविणे यात त्या रमून जायच्या. त्यातूनच "स्वयंप्रभा " या ब्रँड चा जन्म झाला. वयाच्या जवळपास ६५ व्य वर्षी त्यांनी स्वतःचं एक visiting कार्ड बनवलं. त्यांच्या कामाला भरपूर दाद मिळाली.अजूनही मिळते. त्यांचं काम लोकांच्या पसंतीस पडतं. पण त्याच वेळी "घर " ही आपली priority समजून त्यांचं काम सुरु असतं. त्यासाठी लागणारा माल त्या प्रत्यक्ष जाऊन घेऊन येतात. गेल्या काही वर्षात थोड्या तब्येतीच्या कुरबुरींमुळे ते शक्य होत नव्हतं पण usually मी "मुंबईत कशी फिरू " असा विचार न करता आपल्या बहिणींबरोबर त्या crowford मार्केट ला वगैरे जाऊन भरपूर सामान घेऊन यायच्या आणि मग वर्षभर त्यातून अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार करायच्या.
गेल्या वर्षी आजारपणापायी त्रस्त झाल्या, चालताना काठी घेऊन चालावं लागायचं. हाताला उद्योग होता पण शारीरिक त्रास खूप होता. एक मोठं operation पण झालं . ना-उमेद होत होत्या.पण....
ज्या lockdown मध्ये अनेक जण हवालदिल झाले, ना-उमेद झाले तेव्हा या तरुणीने आधी अगदी घरच्या घरी लोणची, त्यांचा हातखंडा असलेल्या चटण्या विकायला सुरुवात केली. घरी आलेल्या लिंबाचं काय करायचं? असा विचार करून. त्यालाही भरपूर मागणी. मग दिवाळी जवळ आली आणि या "स्वयंप्रभेने " पुन्हा भरारी मारली.
आता स्वयंप्रभा केवळ घरगुती राहिली नाही तर एक "व्यवसायाचं" रूप घेऊन आली. पदार्थांच्या quality पासून तर packaging पर्यंत तिला एक व्यावसायिक नजर आली.
आणि याची प्रणेती सगळीकडे जातीने लक्ष घालू लागली. घरचे जिने दिवसातून २-३ दा चढू-उतरू लागली, सकाळी ८ ते रात्री १० अव्याहतपणे काम करीत राहिली. प्रचंड दमणूक होत होती पण जिद्दीने उभी राहिली. तिच्या हातची खास चव असलेले पदार्थ जसे चिवडा, चकल्या, लाडू, शंकरपाळे याला भरपूर मागणी आली. आणि गेल्या काही वर्षात थोडी हरवलेली "आशा " दुप्पट वेगाने उसळून वर आली. सगळ्या मागण्या पूर्ण केल्या.
यात संपूर्णपणे केवळ साथच नाही तर हे स्वतःचं स्वप्न समजून प्रत्यक्ष सहभाग देणाऱ्या घरच्या मंडळींनी रात्रंदिवस कष्ट करून "स्वयंप्रभेला " पंख दिले.
आपण फक्त म्हणतो " age is only the number" पण काकूंनी ते सिद्ध करून दाखवलं. आपली मुलं, सुना आणि नातवंडांवर खूप माया करणाऱ्या, हरहुन्नरी स्वभावाच्या, उत्तम sense ऑफ humor असणाऱ्या आणि energetic असणाऱ्या आमच्या काकूंना मनापासून नमस्कार आणि "स्वयंप्रभेला" खूप साऱ्या शुभेच्छा !
1 Comment
काकू आणि नरेंद्र भिडे दोन्ही व्यक्तिचित्रं अतिशय सुरेख, आणि मनाला भिडणारी