चांगलं - वाईट हे आपलं मनच ठरवत असतं. कुठे आयुष्याची लय जास्त वाटते तर कुठे अतिशय संथ . कुठे अतिशय शिस्तबद्ध - आखलेलं आयुष्य तर कुठे पसरलेलं आयुष्य. " मला जमतंय " असं वाटता - वाटता " पार न पायो " अशी अवस्था . बऱ्याचश्या गोष्टी बिनसताहेत तर बऱ्याचशा गोष्टी " उत्तम" ही घडताहेत. काही बाबतीत मनस्वी समाधान तर काही गोष्टीत प्रचंड मनस्ताप.
पण त्याला आपण चांगलेच माहीत आहोत. कोणाला कुठे न्यायचं हे त्याला नक्की माहिती आहे. पण आपण ह्या भ्रमात आहोत कि आपणच सगळं घडवतोय . तो तुम्हाला "उंच आकाशात भरारी घे "असं सांगतो लावतो तर कधी धाडकन जमिनीवर आपटतो. कधी तुमच्या अस्तित्वाला अर्थ देतो तर कधी " इथली" निरर्थकता स्पष्ट करतो . कधी असणं - नसणं हे ठळकपणे जाणवून देतो तर कधी "नसणं" हेच अंतिम " सत्य " आहे याचंही " भान " आणून देतो. संसारात " रममाण " व्हावं असा भास निर्माण करताना संसार " अळवावरच्या पाण्याच्या थेम्बासारखा करावा " अशीही परिस्थिती आणतो .सगळ्या गोष्टींकडे "सकारात्मक" दृष्टीने बघणे यातच आपला हित .
या चांगल्या- वाईटाच्या पहाडान्मधून चाललेली " जीवन" नावाची नाव . हाकणारे तुम्हीच . अंत माहीत नाही. दिशा माहीत नाही . चालवणारा दुसरा कोणीतरीच . जो आपल्याला माहीत नाही .