आपण नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टींची वाट पाहत असतो. लहान बाळाला घरी येणाऱ्या आईची वाट, पत्नीला पतीची वाट, आई वडिलांना माहेरी येणाऱ्या मुलीची वाट, दुःखाला सुखाची वाट, application केली असताना interview call ची वाट ….वगैरे।वगैरे … आपण बरचसं आयुष्य पुढे येणाऱ्या भविष्याची वाट पाहण्यातच घालवत असतो।यात वाईट काहीच नाही. पण या सगळ्या प्रपंचात आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींकडे आपण दुर्लक्ष तर करीत नाही आहोत न याचा एकदा विचार करावा असं वाटतं. आपल्याला आपण कसे असावे असं वाटण्यात आपण आत्ता कसे आहोत हे आपल्याला कळत असतं का.?
उज्ज्वल उद्याची आस असणं हे जीवनातल्या आशावादाच लक्षण आहे पण आजच्या वर्तमानात राहणं म्हणजेच जगणं असतं नं ? भविष्याचं दान आपल्या बाजूने पडेल कि नाही हे सांगता येत नाही पण म्हणून आज पदरी पडलेल्या दानाने आपण आनंदी होऊ शकत नाही का? आणखी हवं ची लालसा संपतच नाही आणि त्यामुळे आज वर कालची किंवा उद्याची छाया असते आणि हा आजचा क्षण निसटून जातो.
म्हणून मित्रांनो भरभरून जगा. खूप आनंदी रहा. Just be optimistic. Everything will fall in place…
आनंदाची वाट