किती छान कल्पना !मातृत्व साजरं करायचं. या निमित्ताने मुलांनी आयांना छोट्या-छोट्या भेटी द्यायच्या. तेवढ्या लहानशा gesture नी आई खुश होऊन जाते. ते लहानसं card असतं. surprise द्यायचं असतं. ते आईला कळू नये म्हणून धडपडणं. बरेचदा बाबांच्या मदतीने लपवलं असतं gift. जो आनंद आई कायम " देण्यात" मिळवते , तसाच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो. मुला विसरली की आई खट्टू होते मनातल्या मनात.
माझ्या पिल्लांनी पण एक गोड भेट दिली. ती देताना त्यांच्या डोळ्यातला आनंद अवर्णनीय होता. मग काय ..mom खुश. तो आनंद दिवसभर पुरला.
ही पाश्चात्य संस्कृती आहे वगैरे सगळं बाजूला ठेवलं तर मला वाटतं हे appreciation आई या व्यक्तीपेक्षा तत्वाला असतं किंवा असायला हवं. आईसारखी माया करणारी अनेक माणसं आपल्याला आयुष्यात भेटतात. तुकोबांनी तर विठोबाला सुद्धा विठाई , विठू माउली असं म्हटलं आहे, जे क्वचितच कुठे मिळतं. मातृ -तत्त्व अनेक ठिकाणी प्रत्ययाला येतं … आपल्या वृत्ती जागृत असाव्या लागतात. या निमित्ताने पुन्हा मला माझ्या super mom ची आठवण झाली. हसरी, सहनशील,कणखर अशी आई. आम्हा सगळ्या बहिणींना 'आई ' तत्वाची ओळख करून देणारी एक उत्तम व्यक्ती.
आईसमान असणाऱ्या माझ्या सासूबाई.. लग्नानंतर सगळ्या बाबतीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या.. मुलांच्या संगोपनात परोपरीने मदत करणाऱ्या .. एक मैत्रीचं नातं निर्माण करणाऱ्या ..निरपेक्ष प्रेम करणाऱ्या ..
या मातृ-दिना निमित्त ..... मां तुझे सलाम