काल चतुरंग मध्ये डॉ. कमलाबाई भागवत-सोहोनीन्बद्दल वाचलं. प्रचंड अभिमान वाटला. अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरणादायी जीवन. कमलाबाई या Lady Scientist होत्या. "जीव-रसायनशास्त्र" हा त्यांचा अभ्यासाचा विषय. Lady हे मुद्दाम लिहिलं त्याला कारण आहे. या विषयात संशोधन करायचं असा निश्चय करून Bangalore च्या IISc संस्थेत त्यांना प्रवेश नाकारला गेला. का? तर तत्कालीन प्राचार्य Dr. C. V. Raman यांनी त्या केवळ स्त्री आहेत--हे एवढंच कारण दिलं आणि स्त्रीचा हा प्रांत नाही हे परस्पर ठरवून टाकलं. हट्टाने काही अटी मान्य करून त्यांनी तिथे प्रवेश मिळवला आणि स्वतःची मेहनत आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर M.Sc. ही पदवी मिळवली. PhD साठीही तोच अनुभव. परंतु काहीतरी great घडायचं होतं म्हणून त्यांना त्याकाळी अमेरिकेला PhD करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. संधीचं सोनं करून या धडाडीच्या बाईने केवळ १४ महिन्यात प्रबंध सदर केला.--हे आजच्या IT युगातही शक्य नाही. स्वतःच्या नावावर Nature सारख्या Top Journal मध्ये papers लिहिले. जवळपास १३५ technical papers लिहिले.
एक स्त्री म्हणून त्यांना बऱ्याच संघर्षाला सामोरं जावं लागलं. पुरुष सहकार्यांचा जाच आणि स्पर्धा दोन्हीला तोंड द्यावं लागलं. एक उत्तम संशोधक म्हणून नाव कमावलं त्यांनी. त्यांच्या संघर्षामुळे आणि वादातीत कामगिरीमुळे आजच्या आम्हा Researchers चा मार्ग मोकळा झाला. जेवढा संघर्ष त्यांनी केला त्या मानाने आमचा संघर्ष फारच कमी होता.
अशीच एक जगावेगळी स्त्री म्हणजे हिराबाई बडोदेकर. जेव्हा स्त्रीने रंगमंचावर बसून गाण्याची मैफिल करणं हे समाजमान्य नव्हतं तेव्हा शालीनपणे तंबोरा हातात घेऊन मैफिली हिरा बाईंनी केल्या. शास्त्रीय संगीत मांडल्यानंतर "वंदे मातरम" ने हिराबाई मैफिलीची सांगता करीत.
हिराबाईन्मुळे आमच्यासारख्या गायिकांना कधी संघर्ष करावा लागला नाही. स्त्रीने stage वर गाणं समाजमान्य झालं.
या दोघींच्याही बाबतीत एक समान सूत्र म्हणजे त्यांच्या वडिलांचा त्यांना असलेला भक्कम पाठींबा. स्वतःच्या मुलीवर (मुलासारखं म्हणणार नाही मी ) असलेला विश्वास आणि त्या मुलींनीही गाजवलेले कर्तृत्व याने इतिहास घडला.
या निमित्ताने मला माझ्या वडिलांची तीव्रतेनी आठवण होते. Civil Engineering ही मुलींसाठी नसलेली branch (अजूनही असा समज आहे) मी घेतली तेव्हा त्यांनाही वाटला असेलच कि हिला हे झेपेल का? परंतु admission घेताना "Are You Sure ?" एवढंच म्हणाले. गाण्यासाठीदेखील नेहमी प्रोत्साहन दिलं. " तू एकदम top grade artist हो . म्हणजे तुझा संघर्ष कमी होईल " असं म्हणायचे.
माझी PhD आणि आकाशवाणीची "A " grade साधारण एकाच काळात झाली. दोन्ही certificates घेऊन जेव्हा त्यांना भेटायला नागपूरला गेले तेव्हा त्यांना झालेला आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. पण "हां ठीक हैं " असा म्हणाले. मला माझी पावती मिळाली.
पण त्याच बरोबर स्वतःचे career घडविताना संसार व मुलांकडे दुर्लक्ष होवू देवू नका ही त्यांची शिकवणही कायम मनावर कोरल्या गेलीये.
आजच्या Father's day च्या निमित्ताने समस्त वडिलांना सलाम. विशेषतः आपल्या मुलींवर विश्वास ठेवून त्यांची प्रेरणा होऊन, प्रोत्साहन देवून अनेकदा समाजाविरुद्ध पोहण्यासाठी बळ देणाऱ्या वडिलांना salute. आम्हा सर्व बहिणींचे प्रेरणास्थान असलेल्या आमच्या आई -बाबांना साष्टांग नमस्कार