लहानपणापासून मला अभ्यास करायला आवडायचं. पहिल्या ३नात नंबर असायचा. ७ वीत असताना काय भूत शिरलं माहीत नाही, अभ्यासाचा कंटाळा यायचा. त्याचा परिणाम म्हणून माझा ४था नंबर आला. खूप वाईट वाटलं. आपलं यश कधी गृहीत धरू नये. मग ८वीत परत अभ्यासाला लागले आणि शाळेतून पहिली आले. हुरूप आला आणि तोच टेम्पो १०वी पर्यंत टिकला. मेरीटलिस्ट मध्ये आले..शाळेतून पहिली वगैरे.
परत यश गृहीत धरलं. ११वी त काही अभ्यास केला नाही...फोकस १२वी वर..obviously % घसरलं. १२ वीत कसर भरून काढली पण मेरिट मध्ये नाही. इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतली.. पण groove मध्ये यायला वेळ लागला. आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का याच वर्षी मिळाला. आई गेली. अभ्यासाचा फोकस पण गेला. हाती काही उरणार की नाही कळेनासं झालं. आत्मविश्वासाचा पार धुव्वा उडाला. खूप जिद्दीने स्वतःशी आणि परिस्थितीशी लढत परत स्वतःला ट्रॅक वर आणलं. आणि फायनल इयर पर्यंत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवलं. या अपयशाने तर आयुष्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. बऱ्याचशा गोष्टी हातून निसटल्या. स्वतःच्या कोशात गेले. आत्मपरीक्षण केलं. स्वतःला जोखण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा mainstream मध्ये आले. स्वतःला स्वतःपुढे ताठ मानेनी उभं करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आणि post graduation केलं.
सांसारिक जवाबदार्यांतून डोकं वर काढलं तेव्हा लक्षात आलं की आपण परत पहिल्याच चौकोनात उभ्या आहोत. जग पुढे निघून गेलंय फार. पुन्हा संघर्ष. नोकरीची आवाक्यात असलेली संधी नाकारली गेली. अजून एक अपयश. got a feel that I am good for nothing. परत एक setback. स्वतःला सावरत मेहनत करत PhD ला ऍडमिशन घेतली आणि झोकून दिलं कामात. जोमाने कामाला लागले आणि मग पट बदलायला लागला. हरवलेलं गवसायला लागलं. माझा संघर्ष मलाच माहीत होता आणि ही आता शेवटची संधी होती..आर या पार. वाजवीपेक्षा कमी वेळात उत्तम काम झालं. नावाजलं गेलं आणि दिशा मिळाली. good for something झालं. SWOT analysis केलं आणि मग स्वतःकडे बघून हसले.
अशक्य काही नाही हे सांगणं खरंच सोपं असतं .करणं खूप कठीण.. पण साधल्यानंतरचं समाधान काही औरच असतं. त्याचं त्यानेच अनुभवायचं असतं. खूप शक्ती पणाला लागते. अपयशातून धडपडून शिकलेलं कायम कोरलं जातं.
या प्रवासात 'dont give up ' हे सांगणारा परमप्रिय मित्र -आयुष्याचा सोबती मिळाला म्हणून काही मिळवण्याला अर्थ लाभला.
तर मित्रांनो compete with yourself only and be optimistic...लगे रहो...