नवीन पिढी खूप fast आहे हे मान्य करावंच लागेल. नवीन गोष्टी ते भराभर शिकतात. त्या apply करतात. वेळ साजरी करतात . गेल्या २-३ वर्षांपासून मी माझ्या college च्या students activities मध्ये लक्ष घालतेय. त्यात एखाद्या टीम साठी त्यांचं selection करणं, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालवणं , गेस्ट lectures arrange करणं, त्यासाठीची तयारी करवून घेणं हे आलं . यात मी बऱ्याच गोष्टी शिकले. बरीच निरीक्षणं केलीत.
नवीन पिढीला दिशा नाही म्हणणं चूक आहे हे त्यातला सगळ्यात महत्वाचं निरीक्षण. मुलांमध्ये ऊर्जा आहे. चांगलं काहीतरी घडवण्याचा ध्यास आहे. ज्या गोष्टीवर स्वतःचा ठसा उमटेल अशा गोष्टी करण्यात त्यांना नेहमीच रस असतो. सारखं मागे लागणं त्यांना आवडत नाही हे दुसरं निरीक्षण .. एखादी गोष्ट कशी करायची याचे त्यांचे निराळे ठोकताळे असतात. त्यात आपला सल्ला बसला तर तो ऐकण्यात येतो अन्यथा सपशेल धुडकावण्यात येतो..ऐकावे जनाचे ..करावे मनाचे हे सूत्र तंतोतंत पाळणारी हि पिढी ..चूक काहीच नाही ..पण जुळवून घेताना दमछाक होते बाकी..
दीड वर्षांचा असताना शाश्वत पलंगावरून पडला. डोक्याला लागलं . तशाच अवस्थेत ती धावत Dr. कडे धावली ट्रॅफिक ची पर्वा न करता. जीवाच्या आकांताने शाश्वत रडत असताना सीमाही आतून रडत होती. दवाखान्यात औषधांमुळे शाश्वत नीट झोपला. पण त्याच्या उशाशी बसलेली सीमा रात्रभर जागी होती. जराही तो हलला तरी लगेच उठून बघत होती.
सगळं छान असतं पण तरी काहीतरी खटकत जातं ..विचार केल्यावर जाणवलं कि या पिढीला सगळ्या गोष्टी at the tip of the finger मिळण्याची सोय उपलब्ध आहे.. फार चांगली गोष्ट आहे खरं तर ..पण .. यामुळे होतंय काय तर मुलांना स्वयंशिस्त नावाचा काही प्रकार असतो हे माहितीच नाहीये. सेल्फ organised राहणं गरजेचं आहे हे कळतच नाहीये यांना. एखादं महत्वाचं काम करतानाही सतत डोकं आणि बोटं फोन वर काहीतरी शोधत असतात. distractions असतात आणि त्यामुळे वेळेवर काम होण्यासाठी planning ची गरज आहे, वेळेवर कसं बसं उरकलेल्या कामात quality येत नाही , परिपूर्णतेचा आनंद मिळत नाही हे जाणवत नाहीये या पिढीला. वेळ निभावतात उत्तमरीत्या पण ' हो जायेगा' हे cool असण्याचं लक्षण समजल्या जातं .
प्रश्न असा उमटला की , आपली पद्धत आणि त्यांची पद्धत बदलत गेली म्हणजे generation gap निर्माण झाली का?
पण म्हणूनच आपली जवाबदारी आणखी वाढलीये असा जाणवत राहतं . त्यांना माहिती जंजाळातून बाहेर काढून screen च्या पलिकडचं जग दाखवणं , काहीतरी great करण्यासाठी प्रवृत्त करणं, कायम दूषणं न देता त्यांच्या बरोबर चालणं , राहणं गरजेचं ठरतं. मी या बाबतीत प्रचंड आशावादी आहे. आणि तुम्ही ?