सतराव्या शतकात रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र लिहिलं. त्यात " अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे" ..असं लिहिलंय.. रसायनशास्त्र शिकताना.. अणू -रेणू..proton -neutron -electron याबद्दल ही शिकलो. कुतूहल खूप होतं .तेव्हाही आणि आताही. हे जग लहान लहान कणांनी तयार झालंय .. यातला प्रत्येक जीव गुरुत्वाकर्षणाने या जमिनीशी जोडला गेलेला आहे. हे सगळं माहिती होतं. एक अखंड अशी मानवी साखळी एकमेकांना जोडली गेलेली आहे. हेही कळत होतं . पण ती जाणवून देण्याचं काम एका अति सूक्ष्म अशा protein molecule ने करून दाखवलं ..
भौतिकतेच्या आहारी गेलेलो आपण सर्व. आणि " आम्हाला काही होत नाही " हा अहंकार. हळू हळू कमीच होत चाललेलं सामाजिक भान आणि जवाबदारी. " मी "आणि " माझ्याभोवती" फिरत असलेले आपण. सगळ्यांना एका झटक्यात भानावर आणण्याचं काम या RNA नी केलं. आपल्याजवळ काय आहे आणि काय नाही याचा सरळ हिशोब मांडण्याचं काम याने केलं . काम करणाऱ्याला घराबाहेरही न पडता खूप काम करता येतं आणि नसणाऱ्याला प्रचंड कंटाळा पण येऊ शकतो.
एकमेकांशी वाद-संवाद-विसंवाद जो आहे तो प्रकर्षाने जाणवून देणारा हा काळ. एरवी जगरहाटीमध्ये झाकलेले गुण -दोष अचानक एकमेकांसमोर आले. आणि सगळ्या गोष्टींमध्ये हरवलेला माणूस माणसालाच शोधायला लागला. जे कुटुंब एकत्र येऊ शकलं ते नशीबवान ठरलं . पण जगाच्या पाठीवर असलेले अनेक जण एकमेकांच्या सहवासासाठी आतुरले एरवी दैवी शक्तीला गृहीत धरलेले आपण दिवसातून एकदा तरी देवासमोर हात जोडायला लागलो.
मनाचे व्यापार अनंत. प्रत्येकाचं अथांग आभाळ. त्या आभाळात मुक्त संचार करायला मिळण्याचा हा काळ. हाताला जसं काम पाहिजे तसंच मन आणि मेंदूला खाद्य पाहिजेच असा वाटायला लावणारा हा काळ. एक स्वल्पविराम घेण्याचा हा काळ. प्रचंड सामाजिक, आर्थिक आणि वैश्विक उलाढाल घडण्याचा हा काळ.
एक रेणू असा सर्व ब्रह्मांडाला व्यापून राहिला. साकारात्मकतेनी राहण्यातच असगळ्यांच हित आहे हे सांगून गेला. त्या विधात्याने "हातचा एक" स्वतःकडे राखून ठेवल्याचंही स्पष्टपणे जाणवून गेला.
4 Comments
सध्या तरी 10 टक्के लोक धरती वर आली असतील अशी आशा करूयात आणि येणाऱ्या काळात उरलेली 70 टक्के येतील अशी अपेक्षा आहे. 20 टक्के लोकांना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याची प्रचिती येऊ नये म्हणजे मिळवलं
व्वा क्या बात है. अगदी नेमकेपणाने नोंदवलेलं निरीक्षण!
Chan lihle she
Hello Dear Dr. Minal
छान लिहले. अभिनंदन
Prof Dr Mahajan
Vnit Nagpur