जसे आपण घराबाहेर पडतो तसे अनेक चेहरे दिसायला लागतात. ओळखीचे कमी अनोळखीच जास्त. ना नात्याचे आणि गोत्याचे. मला ना अशी वलयं दिसायला लागतात एकेका भोवती. एकमेकांमध्ये न मिसळणारी. वेगळ्या वाटा .. वेगळ्या दिशा...वेगळे संघर्ष.. बरेचसे स्वतःशीच. आज काल जवळपास प्रत्येक जणाची नजर मोबाइल मध्ये . ते आणिक एक वेगळं विश्व. ट्रेन मध्ये तर सगळ्यांच्या माना झुकलेल्या. गर्दीत privacy जपण्याची धडपड. मजा वाटते मला हे बघून. आजूबाजूचे नको असलेले आवाज ऐकू येऊ नयेत म्हणून लगेच हेड फोन्स येतात.
नको असलेली दृश्य बघायला नको म्हणून फोन मधील आर्टिकल्स, सीन्स,movies आहेतच. कुठे थांबावं हे न कळून भांबावलेलेही असतात अनेक जण. सारखं बाहेर बघून बघून दमायला होत नसेल का? आत बघायला वेळ उरत असेल का? स्वतःला ओळखणं जमत असेल का? पुस्तक वाचन होत असेल का? एखाद्या गोष्टीसाठी जीव टाकणं होत असेल का? असे अनेक प्रश्न पडतात मला. आणि मग वाटत राहतं की “ हर तरफ हर जगह बेशुमार आदमी। फ़िर भी तनहाईयोंका शिकार आदमी”
सारखं बाहेर बघून बघून दमायला होत नसेल का? आत बघायला वेळ उरत असेल का? स्वतःला ओळखणं जमत असेल का? पुस्तक वाचन होत असेल का? एखाद्या गोष्टीसाठी जीव टाकणं होत असेल का?