एक संजू बाबा असतो..बिच्चारा .. काहीच केलं नसतं त्याने.. तरी पण अख्खी नाय व्यवस्था त्याला निरापराध ठरवायला सगळी शक्ती पणाला लावते ..त्याने फक्त काही देशद्रोही लोकांना देशात शस्त्र आणायला मदत केली असते ..त्यातली काही शस्त्र स्वतःजवळ ठेवली असतात..खेळणी म्हणून..त्याला बाकी काहीच माहिती नसतं ..त्यामुळे काही कुटुंबं उध्वस्त झाली असतात ...मला काही माहीत नाही म्हणतो आणि निकाल लावायला नाय व्यवस्था २० वर्ष लावते ..
त्यानंतर त्याची छान बडदास्त ठेवली जाते..त्या बिचार्याच्या कौटुंबिक सोहोळ्याना त्याला हजेरी लावू दिली जाते ..रोज शाही जेवण वगैरे दिलं जात...आणि पूर्ण शिक्षाही न भोगता हा बिच्चारा बाहेर येतो..खूप लोक त्याची वाट बघत असतात ..त्याचे सिनेमे बघतात ..त्याला भरपूर पैसे मिळवून देतात..आणि आपलं कर्तव्य पार पाडतात.. आणि नाय व्यवस्थेचे वाभाडे काढण्यात आपण किती यशस्वी झालोत याचा आनंद व्यक्त करतात...
एक सल्लू भाई उर्फ टायगर असतो बिच्चारा .. त्याने पण काहीच केलं नसतं .. ज्या माणसांना घर नसतं ती वेडी माणसं रस्त्यावर झोपली आणि याच्या गाडीने चुकून दोघांचा जीव घेतला... निरपराधीच तो.. लोकांनी घरात नको झोपायला? असा याचा युक्तिवाद..माणसं मारली तेव्हा ड्राइवर गाडी चालवत होता.. ड्राइवर आणि गरीब माणसांची किंमत असते?
हाच सल्लू शिकारीला गेला.. licence वगैरे त्याला विचारणं म्हणजे..अबब..कोण विचारेल?बरं तर त्याने २ हरीण,२ काळवीट (नक्की नंबर कुणालाच माहित नाही..)यांचे हाल करून मारले..प्राणी याच साठी तर असतात.. त्यांच्यावर यथेच्छ ताव मारला.
पण एक बिष्णोई नावाच्या माणसाने पाठपुरावा केला या गरीब बिच्यार्याचा.. आणि अक्खी आयुष्याची पुण्याई पणाला लावून कशी बशी त्याला ५ वर्षांची शिक्षा मिळवून दिली... एका रात्रीसाठी चक्क हा जेल मध्ये पण होता..रडत रडत.. इनोसंट होता ना ..
He does not deserve this ..असं म्हणत समस्त film industry त्याला सांगत होती " भिऊ नकोस..आम्ही तुझ्या पाठीशी आहोत" ... आणि सल्लू भाईंचे followers नाय व्यवस्था किती खराब आहे.. मल्ल्या / नीरव सारखे तर देशातून बाहेर पडले..हा बिच्चारा तर इथे राहिला..तरी त्याला शिक्षा? असे प्रश्न विचारत होते..
गम्मत तर पुढेच आहे.. आमच्या innocent माणसाला शिक्षा दिली म्हणून एका रात्रीतून न्यायाधीश महाराजांचीच बदली होते.. दुसरे न्यायाधीश लगेच या बिचार्याला सोडवतात.. आता सगळं आलबेल.. चाहते खुश.. सेलेब्रेशन time ..मग जंगी पार्ट्या .. मज्जानु life ... आता त्याचे सगळे प्रोजेक्ट्स पूर्ण होतील. कष्टाने मिळवलेले पैसे खर्च करून आपण त्यांना करोडो पैसे मिळवून देऊ .. स्क्रीन वर हा गरिबांचा मसीहा वगैरे असेल.. संजू बाबाचे सिनेमे आपण पहिले आणि पाहतोच की ...
मजेची गोष्ट ही की हे असंच होणार हे तमाम जनतेला माहित असतं.. केवढा विश्वास आहे आमचा न्याय व्यवस्थेवर..सगळे रस्ते बंद झाले तेव्हा न्यायाधीशांची बदली.. कोण राबतं यासाठी? का हे सगळे इतके निर्ढावलेले आहेत? का देशद्रोह्यांना देशात मान दिला जातो? आपण इतके जाड कातडीचे झालो आहोत का?
सारखा प्रश्न मनात येतो कि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात ... जिथे न्याय व्यवस्था सगळ्यात श्रेष्ठ मानायला हवी.. त्यावरच कुणाचा विश्वास नाही... का ठेवावा आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास?