दिलों में बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम ...असं म्हणतात ..पण चित्ती असो द्यावे समाधान असेही म्हणतात ..काय करावे बरं ? अस्वस्थ मनामध्ये समाधान कसं येणार किंवा समाधान असल्याशिवाय आयुष्याला अर्थ कसा मिळणार?
live life as it comes to you असं म्हणतात पण ध्येय गाठण्याचा संघर्ष ही असावा म्हणतात ..कसे करावे बरं ? ध्येय नसेल तर रोजच्या सूर्याला काय सांगणार किंवा येणाऱ्या दिवसाला तोंड दिल्याशिवाय उद्या कसा उगवणार?
प्रपंच करावा नेटका म्हणतात ..पण.. प्रपंचात गुंतून जाऊ नका ..असंही म्हणतात ..काय करावे बरं?
मांडलेला संसार नेटका करावा..की "त्या" च्या वर सगळं सोडून द्यावं?
असेल माझा हरी तर... असेही म्हणतात आणि प्रयत्नांती परमेश्वर असेही म्हणतात .. काय करावे बरं ? सगळं "त्या" च्या वर सोडलं तर प्रयत्न थांबतात आणि फक्त प्रयत्न केले तरी "त्या" ची साथ मिळेलच असं नाही.
"बहु गुन काम ना आए जब लग करम ना जागे" असं म्हणतात पण "करम करम क्या जाने मुरख" ..असंही म्हणतात..काय करावे बरं ? फक्त गुणांची कास धरायची की कर्मावर पण भरोसा ठेवायचा?
आलेला ताप ३ दिवस घेतोच म्हणतात तर शरीराला औषधाशिवाय आराम मिळणार नाहीं असेंहि म्हणतात.. काय करावे बरं ?
सूर गळ्यातच असावा म्हणतात तर रियाजानेच गाणं साधतं असेही म्हणतात .. काय करावे बरं ?
confusion हि confusion है ....solution कुछ पता नहीं.... पण हो ..सगळ्यांनीच आनंदी राहायला सांगितलं आहे.. तसंच करू या..)