"इस शहर में हर शख्स परेशान " आहे . आवाज- नाद- गोंगाट ही सगळी आवाजाचीच रूपं. पण आतला आवाज नेहमी बाह्य जगापेक्षा वेगळा असतो. आपल्याला सतत काहीतरी सांगत असतो. सुचवत असतो. प्रत्येक वेळी तो बरोबरच असतो असं नाही. त्याला कसं वळण लावायचं हे आपल्या हातात त्यापेक्षा मनात असतं . पण त्या आवाजाचा स्वर आपल्याला नक्की कळतो. तो perfect लागला कि त्याचा अंतर्नाद होतो आणि मग आयुष्य एक प्रवाही संगीत होतं.
मनाची शांतता राखणं महत्वाचं. मन शांत, composed असलं की बाहेरच्या गोंगाटाचा त्यावर परिणाम होत नाही . पण मन ही एक फार मोठी आणि गहन गुहा आहे. एखाद्याचे मनोव्यापार ब्रह्मदेवालाही कळणार नाहीत. त्यामुळे "मी त्याला ओळखतो/ओळखते " असा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते काही खरं नसतं. कारण प्रत्यक्ष त्या माणसालाही माहीत नसतं कि तो कधी कसा वागेल. आणि हीच आयुष्याची खरी गम्मत आहे. काहीच ठरलं नाहीये , पण सगळं घडतंय. कधी मनासारखं .. कधी मना विरुद्ध.
मात्र आयुष्याला दिशा देण्याचं काम आपल्यालाच करावा लागतं . त्यासाठी आयुष्य आखून घ्यावं लागतं . २४ तासांचं planning करावं लागतं आणि असं कर्म करावं लागतं की रात्री शांत झोप येईल. म्हणून मनाला सत्प्रव्रुत्तिच, स्वाभिमानाच आणि सकारात्मकतेचं training द्यावं लागतं. तरच "सुखिया झाला " चा अनुभव येतो. बघा पटतंय का?.. )