अमेरिकेला जायचं असं ठरल्यापासूनच एक उत्सुकता, anxity होती. तशी काही पहिलीच visit नाही पण माझ्यासाठी म्हणून झालेली पहिलीच. म्हणून जास्त मजा. दोन वेगवेगळे देश. वेगवेगळ्या श्रद्धा, वेगवेगळ्या प्रवृत्ती, वेगवेगळ्या जगण्याच्या पद्धती. सगळ्यात भावली ती माणसानी माणसाला दिलेली personal space. फारसं कुणी कुणाच्या मध्ये येत नाही. पण कधी कधी पराकोटीची अलिप्तता. सुरुवातीला गर्दीतही एकटं वाटत होतं . पण थोडं इतरांशी संभाषण वाढल्यावर कमी झालं.
सगळीकडे एक शिस्त. कोणी रांग मोडून पुढे गेलेला दिसला नाही. सगळीकडे माणूस एकच. त्यांच्यामधले बंध एकाच जातीचे. पण ways of expressions वेगळे. आम्ही मात्र एकमेकांचीच कंपनी enjoy केली. जमीन, आकाश आणि पाणी यावर फिरणाऱ्या सगळ्या माध्यमांचा वापर करून फिरलो. शाकाहाराच्या शोधात खूप पायपीट केली. धमाल केली.
पण ४-५ दिवसातच घराची ओढ लागली. मुलांची आठवण यायला लागली. मुंबईकडे येण्याचा शेवटचा प्रवास नकोसा झाला. घरी आल्यावर सासूबाईनी आणि मुलांनी घरी केलेलं स्वागत अवर्णनीय. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, excitement, उणीव भासल्याच्या छटा चटकन नजरेनी टिपल्या. my sweet home. निखळ आनंद.
माझ्या पाठीशी नेहमी उभ्या राहणाऱ्या सासूबाईंबद्दल खूप कृताध्न्यता वाटली.
आणि ….
परत एकदा जाणवून गेलं … बाबा हवे होते.…