मैत्री … मैत्रीपेक्षा मला मैत्र हा शब्द जास्त भावतो. मैत्र जुळावं लागतं. प्रत्येकाशीच जुळेल असं नाही. मैत्री अनेकांशी होऊ शकते. रोज फिरायला जातानाचे सहकारी,collegues, विद्यार्थी, वयाने लहान - मोठे मित्र असू शकतात. पण मैत्र जुळायला वेळ लागतो पेक्षा वेळ द्यावा लागतो. भलेही त्यात common interests नसतील ,आयुष्याची समान्तरता असेल ,domains वेगवेगळे असतील पण एक comfort zone असतो. विशेष कोपरा असतो. आपण जसे आहोत तसेच स्वीकारले जाण्याची शाश्वती असते. मुखवटा घालायची गरज नसते . वयाचं बंधन नसतंच आणि असे फारच कमी लोक आपल्या आयुष्यात असतात. "परस्परे जडो ।मैत्र जीवांचे" यात हेच अपेक्षित असेल का?