कसं असतं नं ..आपण सगळ्या गोष्टी करताना आपल्यातलीच एक प्रेरणा आपल्याला हाक मारत असते .त्यात लहानपणी कळत - नकळत झालेले संस्कार तर असतातच पण कुणी सहज म्हणून बोललेलं ...आपल्याला जगण्याचं मर्म शिकवून जातं. मला आठवतं... जेव्हा माझा पहिला जाहीर कार्यक्रम झाला गाण्याचा ...तेव्हा पेपरमध्ये त्याबद्दल छापून आलं होतं(अर्थात चांगलं ). तेव्हा माझे आजोबा म्हणाले होते की गाणं आणि अभ्यास म्हणजे academics ही तुझ्या आयुष्याच्या गाड्याची दोन चाकं आहेत. त्यांना बरोबर् राहू दे . तेव्हा ते असध्याच वाटत होतं . त्याचा नीटसा अर्थही कळत नव्हता . पण एक लक्षात आला होतं की आपल्याला काहीतरी छान करून दाखवायचं आहे. त्यासाठी सातत्य , नित्य नेम आणि मेहनत करायची आहे. आणि म्हणतात नं की काही करायचं म्हणजे अडचणी येतातच आणि तशा त्या आल्या तरच आपण योग्य मार्गावर आहोत असा समजायचं . पण कृती आधी घडते आणि मग विचार ,philosophy येते. आज मी खूप काही मिळवलं आहे असं नाही पण आजोबांच्या त्या बोलण्याचा अर्थ आता नीट कळायला लागला आहे असं वाटतं ..आणि आणखी energy येते ...काहीतरी चांगलं करून दाखवण्याची ....